http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM BHUJBALAYURVED
http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM

Checking delivery availability...

background-sm
Search
91
Home All Updates (67) Page 1 12.17
🌹 *वसंत ऋतू* 🌹 (वैद्य अरुण भुजबळ /ज्ञानदा भुजबळ ) हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते .त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना जसे की आंबा फणस यांना वृक्षांना मोहोर येतो , नवीन पालवी फुटते काही फुलझाडांना सुगंधी फुले येतात . यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कुजनाची !!हाच तो ऋतुराज "वसंत ऋतू" हा ऋतू बाह्य सृष्टी प्रमाणेच आपल्या शरीरात सुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. बाह्य वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफ दोष गोठलेल्या स्वरूपात असतो.वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ होण्यास सुरुवात होते.त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्या प्रमाणे शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळहळू वाढणाऱया उष्णतेने शरीरातील बळाचा ऱहास होण्यास वसंतात सुरुवात होते .वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे , उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते .या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यायला हवा. गवाची पोळी , ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणरा असलयाने त्याचे प्रमाण कमीच असावे .गहू , तांदूळ, ज्वारी इत्यादी धान्य वापरताना ती जुनी वापरावीत. नवीन धान्य कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा .नवीन धान्य वापराने अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे .असे भाजून घेतल्यामुळे त्यांच्यातील कफ वाढण्याचा गुणधर्म कमी होतो .शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके होते. या ऋतुमध्ये तिखट , कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात .कडू , तिखट पदार्थांचा उपयोग भुक वाढविण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची , पुदिना, लसूण, हिंग, मिरे दालचिनी , तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा वापर जरूर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात वापर करावा .कारले, मेथी अशा कडून चवींच्या भाज्यांचा देखील वापर करणे हितावह आहे. तूर , मूग , मसूर अशी कडधान्य कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी , मुगाचे लाडू असे पदार्थ करून वापरण्यास हरकत नाही .कुळिथाचे कढन, कुळिथाचे वरण , कुळथाचे पिठले विविध स्वरूपात कुळिथाचा वापर उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थ आहारात असणे लाभदायी आहे. फळांमध्ये तुरट रसाची फळे हितकर आहेत. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती कवथाच्या फळातून. आपण एरवी कधी कवठाची फळे खात नाही .पण ति तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंतामध्ये त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्माच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत.या काळात येणाऱ्या *महाशिवरात्री* व्रतांमध्ये म्हणूनच कवठाची पुढे समाविष्ट केली गेली .त्यानिमित्ताने या फळांचे सेवन घडते.कवठाचा गर नुसता खाने, गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात . महाशिवरात्रीला कवठाची फळे घेण्याचे जसे शास्त्रीय कारण आहे, तसेच त्या दिवशी उपवास करण्यातहि शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते, म्हणून त्यावर अधिक ताण पुढच्या काळात देता कामा नये याचे द्योतक म्हणून या दिवशी उपवास करण्यात येतो .थोडक्यात संपूर्ण वसंत ऋतूमध्ये कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात पचायला हलका आहार हवा. या ऋतूमध्ये दूध , ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरतांना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो .ते पचायलाही हलके होते.या ऋतूमध्ये होणारा बळाची हानी कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग , जिरे , चाट मसाला असे पदार्थ टाकायला हरकत नाही. दही हे कफ वाढवणारे असल्याने त्याचा वापर टाळावा. तसेच साजूक तुपा पेक्षा या काळात तेलाचा वापर करणे अधिक चांगले.आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाण कमीच ठेवाव. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मास तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटन किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले.सुप मध्ये हिंग , जिरे आदि मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत . मासे, खेकडा या प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये .मासा आहारप्रमाणेच मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे . बाह्यावातावरण उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते . पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधील किंवा माठातील पाणी , बर्फाचा वापर , आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळावा .कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातील अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो . सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते. फ्रिजमधील अन्न पदार्थ सुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत.रूमच्या तापमानानुसार सेवन करावे. अर्थात फ्रिजमधील पदार्थ या टाळलेलेच अधिक चांगले . गार पदार्थाप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअर कंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सातमे होण्याचे दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अंग अंगावर साक्षात लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशन सुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे एसी यांचा वापर जपुन करावा. या ऋतूमध्ये दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हादायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभराच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा.मात्र थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे.अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे.स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे , सेंट्स, डिओडरंट्स यांचाही जरूर वापर करावा .या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. मानसिक थकवा त्यामुळे टाळता येतो .दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो.काही काम करण्याचा फारसा उतसाह राहत नाही .पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतुत टाळले पाहिजे -कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तात्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य करने आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते. *कफाचे विविध आजार सर्दी, खोकला, ताप येणे , शीतपित्त वजन वाढणे इत्यादी इत्यादी या काळात खूप वाढत असतात. म्हणूनच वसंत ऋतुमध्ये वमानासारखे कफ शामक असे उत्कृष्ट पंचकर्म प्रत्येकानेच करून घेण्यास हरकत नाही . *वैद्य अरुण सुभाष भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , आयुर्वेद वाचस्पती, एमडी आयुर्वेद gold medal ) *वैद्या ज्ञानदा अरुण भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , सौंदर्यतज्ज्ञ, योगतज्ञ, आहारशास्त्रतज्ञ ) *भुजबळ आयुर्वेद, निमाणी नाशिक* www.bhujbalayurveda.com 0253-251-9669 9822226267 9822371701
Send Enquiry
Read More
🌹 जेवणापूर्वी चे स्टार्टर🌹 बरेचदा आपण हॉटेलमध्ये , लग्न समारंभ इ.मध्ये जेवणासाठी गेल्यानंतर स्टार्टर- Appetizer या नावाखाली जो आचरटपणा चालला आहे त्यासाठी हा लेख. चायनीज सूप, कसले तरी मंचुरियन , पनीर इत्यादी असंख्य प्रकार हे स्टार्टर च्या नावाखाली खाल्ल्यावर मग जेवायचे काय? त्यानंतर जेवण घेणे म्हणजे अजीर्ण किंवा अपचन होऊन अनेक आजारांना निमंत्रण देणे ठरते .स्टार्टर खरे तर भूक वाढवणारे, तोंडात लाला स्राव, पचन संस्थेत पाचक रसांचे स्राव वाढवणारे, अजीर्ण होऊ न देणारे असावे. ॥भोजनार्गे सदा पथ्यं लवण आद्रक भक्षणम॥ भोजनाच्या सुरूवातीला सेधव मीठ व आल्याचा तुकडा खाणे हा खरा आयुर्वेदिक स्टार्टर आहे याने होणारे फायदे अगणित -- १)चांगली भूक लागणे २)जीभ स्वच्छ होते ३)इतर पदार्थांची असणारी चव नष्ट होते ४)जीभ स्वच्छ झाल्यामुळे पुढे ज्यांना खाणार आहोत त्याची चव उत्तम कळते ५)घसा साफ होतो ६) अन्न नीट पचते ७)अजीर्ण होत नाही सध्याच्या लाइफ स्टाइल डिसॉर्ट्समध्ये (life style disorders)स्टार्टरचा देखील महत्त्वाचा रोल आहे . काय कधी खावे हा सेन्स लोप पावला आहे . मधुर अमल लवण कटू कषाय या क्रमाने अऩ न खाता शेवटी स्वीटडीश, आइस्क्रीम खाल्लं जात आहे .प्रचंड अग्नीमाद्य होऊन जडपणा, कफ, लठ्ठपणा इत्यादी इत्यादी अनेक आजार यामुळे होताना दिसत आहे . असो आपले आयुर्वेदिक स्टार्टर आल्याचा तुकडा आणि सेैधव मीठ हे कोणत्याही हॉटेलमध्ये मिळेलच असे नाही .तो कॅरी करावा लागेल. मी याचा आग्रह करतोय त्यात तुमचे आरोग्य आहे तुम्ही जे ऑर्डर करतात त्यात किती आरोग्य आहे याचा जरूर विचार करावा वैद्य अरुण सुभाष भुजबळ (एमडी आयुर्वेद गोल्ड मेडल) भुजबळ आयुर्वेद पंचकर्म निमाणी नाशिक 0253-251-9669 9822226267 9822371701 www.bhujbalayurveda.com
Send Enquiry
Read More
🌹 *आग का गोला - तिखट रस*🌹 वऱ्हाडी ठेचा , कोल्हापुरी मिसळ खाताखाताच लोक डोळ्यातील पाणी पुसत असतात. हाच तो डोळ्यात पाणी आणणारा, तिखट रस, मिरचीचा ठेचा हाताला लागला तरी आग होते. म्हणजेच तोंडाची हाताची आग ज्याच्यामुळे होते, नाकाडोळ्यातून पाणी येते. तिखट रस काही लोकांना खूप आवडतो तर काही लोक त्याच्या वाटेला हि जात नाहीत. आपल्या आहारामध्ये तिखटपणा थोड्या प्रमाणात असणे पचनाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. मिरची, मिरी, हिंग, कांदा, लसूण, मोहरी, पिंपळी, मुळा हे रोजच्या वापरातले पदार्थ आहेत व जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराचा, तोंडाच्या त्वचेचा दाह करणारे, उष्ण आहेत. स्थूल व्यक्तींनी तिखट चवीचे पदार्थ जरा जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतात, परंतु कृश व्यक्तींनी तिखट खाऊ नये, कारण तिखट खाण्यामुळे शरीरातील मेद धातूचा क्षय होतो. तिखट चवीचे पदार्थ आहारात अल्प प्रमाणात हवेतच. त्यामुळे अन्नाचे पचन शरीरामध्ये व्यवस्थित होते. सुंठ, मिरे, पिंपळी हे तिखट पदार्थ छातीत साठलेला कफ पातळ करतात. त्यामुळे खोकला झाल्यास सुंठ, मिरे, पिंपळी (त्रिकटू चूर्ण) मधाबरोबर घेण्याने फायदा होतो. थोड्या प्रमाणात तिखट खाल्ल्यास पोट साफ होते. उदा. मिरची जास्त प्रमाणात पदार्थात घातली तर त्यामुळे सुरुवातीला पोट साफ होईल पण मिरची जास्त प्रमाणात वारंवार खाल्ली तर मलावष्टंभ होऊन मुळव्याध होईल. अति तिखट खाल्ल्याने तोंड येते, तोंड कोरडे पडून तहान लागते. अति तिखट खाणाऱ्यांची त्वचा निस्तेज, कोरडी दिसते. अतितिखट खाणे म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरला आमंत्रण. एकूणच अती तिखट खाण्यामुळे शरीरातील धातूंची (tissue) गुणवत्ता कमी होऊन कृशता येते. अति तिखट खाण्याने संधिवात होऊ शकतो त्यामुळे (अपवाद - लसणाचा) अती तिखट खाणे स्वास्थ्याला हानीकारकच आहे. *Dr.ARUN SUBHASH BHUJBAL* *BHUJBAL AYURVED* *NIMANI, NASHIK* 9822226267 9822371701 9960856785 0253-251-9669 www.bhujbalayurveda.com
Send Enquiry
Read More
🌹 *मिठाशिवाय जेवणाला चव नाही* 🌹 (सहा रसांपैकी तिसरा लवण रस-खारट) ‘खाल्ल्या मिठाला जरा जागावे’ अशी एक म्हण आहे. श्री कृष्णाने रुक्मिणीला दिलेले मार्मिक उत्तर, *‘तू मला मिठासारखी आवडतेस!’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा ! सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल! Dr.ARUN SUBHASH BHUJBAL (MD AYURVED GOLD MEDAL) NIMANI, NASHIK 9822226267 9822371701 9960856785 0253-251-9669 www.bhujbalayurveda.com
Send Enquiry
Read More
🌹 *चिंचेचे बुटुक - आंबट रस* 🌹 (सहा रसांपैकी दुसरा रस) चिंच बघितल्यावर तोंडाला पाणी न सुटणारा मनुष्यच विरळा! आंबट चवीचा महिमाच असा आहे की आंबट पदार्थाच्या आठवणीने देखील तोंडाला चव प्राप्त होते. आहारामध्ये लिंबू, चिंच, कोकम हे आंबट पदार्थ आपण अन्न रुचकर होण्यासाठीच वापरतो. तसेच अंबाडी, चुका या भाज्या, संत्री, मोसंबी, बोर, करवंद ही फळे. सगळ्यात बहुगुणी म्हणजे डाळिंब आणि आवळा. ही आंबट चवीच्या पदार्थाची यादी वाचतानाच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल! असा हा अम्ल रस! वरण-भातावर लिंबाची फोड पिळने, चव तर येतेच पण पाचक-स्रावही वाढवूनच उत्तम होते म्हणजेच आंबट रस हा चव उत्पन्न करणारा, पचन योग्य घडवून आणणारा आहे. आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसते अशा वेळी आल्याच्या रसामध्ये लिंबूरस व सैंधव मिसळून १ चमचा घ्या व बघा तुमच्या तोंडाला कशी चव येईल! अम्ल रस सारक आहे, गॅसेस कमी करणारा आहे. परंतु तो माफकच खावा .काही लोकांना रोज लिंबू कापून खायची सवय असते. पण ते आरोग्याला घातक आहे. लिंबू, चिंच, लोणची अतिप्रमाणात खाण्यामुळे दात, हिरड्या सैल होतात. केस पांढरे होतात, त्वचेला खाज सुटते, पुरळ येते. पित्त वाढते, उष्णता वाढून जळजळ होते. शरीरातील मासाचा, त्वचेचा घट्टपणा जाऊन ओघळते, सुरकुत्या पडतात. म्हणून लिंबु, चिंच नुसतेच खाणे/ ज्यात त्यात लिंबू पिळण्याचा अतिरेक करू नका. लिंबू रस, चिंच पित्त वाढवणारा असला तरी लिंबू रसामध्ये पाणी, मीठ, साखर घालून केलेले लिंबू सरबत तहान कमी करते, थंड पणा देते, पित्त कमी करते. चिंच भिजवून कोळून त्याचे सरबत करावे , त्यात मीठ, साखर, जिरे घालून चिंचेचा सार बनवल्यास, थंड आहे म्हणून डोळ्यांची जळजळ होणे, तहान लागणे, थकवा होणे यावर लिंबू सरबत, चिंचेचे सार, कोकम सरबत उपयुक्त आहे. *डाळिंब, आवळा , काळे मनुके ही फळे अम्लरसाची असली तरी पित्त कमी करतात*. अम्ल रस रक्त वाढवणारा आहे म्हणून तर अँनिमिया मध्ये डाळिंब भरपूर खावे, रोज मोरावळा खाल्ल्यास पित्ताचा त्रास दाह होणार नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात वापरलेला लिंबू रस, चिंच हे पदार्थ पाचक आहेत, भूक वाढवणारे आहेत. लिंबू रसबत, पन्हे तृष्णा कमी करतात. म्हणून आवडला तरी आंबट रस थोडाच खा, नाहीतर दुष्परिणामांना -अकाली वृद्धत्वाला, अम्लपित्त, त्वचारोगांना सामोरे जा! पित्त प्रकृतीच्या लोकांनी उष्णता जळजळ होत असेल तर आंबट पदार्थ कमी खावेत. प्रत्येक पदार्थांमध्ये टोमॅटो घालणे स्वास्थ्य विरुद्ध आहे. त्यामुळे आम्लपित्त, मुतखडा होणारे रुग्ण संख्येने वाढत आहेत. Dr.Arun Bhujbal (MD AYURVED GOLD MEDAL) NIMANI, NASHIK 9822226267 9822371701 9960856785 www.bhujbalayurveda.com
Send Enquiry
Read More
Page 1 12.17

Updates

treatments