http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM BHUJBALAYURVED
http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM

Checking delivery availability...

background-sm
Search
91
Home All Updates (67) 🌺happy makar sankra
update image
🌺happy makar sankranti 🌺
  • 2019-01-14T17:50:29

Other Updates

Next
Latest
🌹 *वसंत ऋतू* 🌹 (वैद्य अरुण भुजबळ /ज्ञानदा भुजबळ ) हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते .त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना जसे की आंबा फणस यांना वृक्षांना मोहोर येतो , नवीन पालवी फुटते काही फुलझाडांना सुगंधी फुले येतात . यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कुजनाची !!हाच तो ऋतुराज "वसंत ऋतू" हा ऋतू बाह्य सृष्टी प्रमाणेच आपल्या शरीरात सुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. बाह्य वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफ दोष गोठलेल्या स्वरूपात असतो.वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ होण्यास सुरुवात होते.त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्या प्रमाणे शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळहळू वाढणाऱया उष्णतेने शरीरातील बळाचा ऱहास होण्यास वसंतात सुरुवात होते .वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे , उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते .या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यायला हवा. गवाची पोळी , ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणरा असलयाने त्याचे प्रमाण कमीच असावे .गहू , तांदूळ, ज्वारी इत्यादी धान्य वापरताना ती जुनी वापरावीत. नवीन धान्य कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा .नवीन धान्य वापराने अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे .असे भाजून घेतल्यामुळे त्यांच्यातील कफ वाढण्याचा गुणधर्म कमी होतो .शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके होते. या ऋतुमध्ये तिखट , कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात .कडू , तिखट पदार्थांचा उपयोग भुक वाढविण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची , पुदिना, लसूण, हिंग, मिरे दालचिनी , तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा वापर जरूर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात वापर करावा .कारले, मेथी अशा कडून चवींच्या भाज्यांचा देखील वापर करणे हितावह आहे. तूर , मूग , मसूर अशी कडधान्य कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी , मुगाचे लाडू असे पदार्थ करून वापरण्यास हरकत नाही .कुळिथाचे कढन, कुळिथाचे वरण , कुळथाचे पिठले विविध स्वरूपात कुळिथाचा वापर उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थ आहारात असणे लाभदायी आहे. फळांमध्ये तुरट रसाची फळे हितकर आहेत. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती कवथाच्या फळातून. आपण एरवी कधी कवठाची फळे खात नाही .पण ति तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंतामध्ये त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्माच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत.या काळात येणाऱ्या *महाशिवरात्री* व्रतांमध्ये म्हणूनच कवठाची पुढे समाविष्ट केली गेली .त्यानिमित्ताने या फळांचे सेवन घडते.कवठाचा गर नुसता खाने, गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात . महाशिवरात्रीला कवठाची फळे घेण्याचे जसे शास्त्रीय कारण आहे, तसेच त्या दिवशी उपवास करण्यातहि शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते, म्हणून त्यावर अधिक ताण पुढच्या काळात देता कामा नये याचे द्योतक म्हणून या दिवशी उपवास करण्यात येतो .थोडक्यात संपूर्ण वसंत ऋतूमध्ये कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात पचायला हलका आहार हवा. या ऋतूमध्ये दूध , ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरतांना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो .ते पचायलाही हलके होते.या ऋतूमध्ये होणारा बळाची हानी कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग , जिरे , चाट मसाला असे पदार्थ टाकायला हरकत नाही. दही हे कफ वाढवणारे असल्याने त्याचा वापर टाळावा. तसेच साजूक तुपा पेक्षा या काळात तेलाचा वापर करणे अधिक चांगले.आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाण कमीच ठेवाव. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मास तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटन किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले.सुप मध्ये हिंग , जिरे आदि मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत . मासे, खेकडा या प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये .मासा आहारप्रमाणेच मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे . बाह्यावातावरण उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते . पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधील किंवा माठातील पाणी , बर्फाचा वापर , आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळावा .कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातील अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो . सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते. फ्रिजमधील अन्न पदार्थ सुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत.रूमच्या तापमानानुसार सेवन करावे. अर्थात फ्रिजमधील पदार्थ या टाळलेलेच अधिक चांगले . गार पदार्थाप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअर कंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सातमे होण्याचे दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अंग अंगावर साक्षात लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशन सुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे एसी यांचा वापर जपुन करावा. या ऋतूमध्ये दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हादायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभराच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा.मात्र थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे.अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे.स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे , सेंट्स, डिओडरंट्स यांचाही जरूर वापर करावा .या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. मानसिक थकवा त्यामुळे टाळता येतो .दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो.काही काम करण्याचा फारसा उतसाह राहत नाही .पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतुत टाळले पाहिजे -कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तात्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य करने आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते. *कफाचे विविध आजार सर्दी, खोकला, ताप येणे , शीतपित्त वजन वाढणे इत्यादी इत्यादी या काळात खूप वाढत असतात. म्हणूनच वसंत ऋतुमध्ये वमानासारखे कफ शामक असे उत्कृष्ट पंचकर्म प्रत्येकानेच करून घेण्यास हरकत नाही . *वैद्य अरुण सुभाष भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , आयुर्वेद वाचस्पती, एमडी आयुर्वेद gold medal ) *वैद्या ज्ञानदा अरुण भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , सौंदर्यतज्ज्ञ, योगतज्ञ, आहारशास्त्रतज्ञ ) *भुजबळ आयुर्वेद, निमाणी नाशिक* www.bhujbalayurveda.com 0253-251-9669 9822226267 9822371701
Send Enquiry
Read More
View All Updates
treatments